Tap to Read ➤
गणपतीला ‘ही’ १ वस्तू अर्पण करा; सुख, शुभ-लाभ मिळवा
बुधवारी केलेले गणपती बाप्पाचे पूजन, नामस्मरण शुभ लाभदायी मानले जाते.
गणपती बाप्पाच्या केवळ नामस्मरणाने सकारात्मकता येते. एका चैतन्यमय उर्जेचा संचार होतो.
महादेव-पार्वती देवींचा पुत्र गणेश प्रथमेश मानला गेला आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात गणेश पूजनाने, स्मरणाने करतात.
साधारणपणे मंगळवारी गणपतीचे विशेष पूजन, नामस्मरण करण्याला प्राधान्य दिले जाते.
मात्र, बुधवारी केलेल्या विशेष गणपती पूजन, भजन, नामस्मरण यालाही अनन्य साधारण महत्त्व आहे.
ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला वाणी, वाणिज्य, लेखन, कायदा आणि गणित यांचे कारक मानले गेले आहे.
एखाद्याच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत असेल, तर बुधवारी गणपती बाप्पाची पूजा, नामस्मरण करणे लाभदायक ठरते.
गणपतीला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतो, असे मानले जाते.
बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे. या दिवशी २१ दुर्वांची जोडी अर्पण करावी.
असे केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख-समृद्धी आणि बुद्धीप्रदान करतात.
दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणेश पूजन पूर्ण होत नाही. पूजेचे पुण्यही लाभत नाही. गणपतीचे आवडते जास्वदाचे फूल वाहावे.
लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य दाखवावा. लाडू किंवा मोदक नसतील, तर गोडाचा नैवेद्य दाखवावा.
गणपतीचा ‘ॐ गं गणपतये नम:’ हा मंत्र १०८ वेळा किंवा जितका शक्य असेल, तितक्या वेळा म्हणावा.
गणपती बाप्पाला आवडणाऱ्या गोष्टी अर्पण केल्यास ते भाविकांसाठी शुभलाभदायक ठरू शकते, असे सांगितले जाते.
'तिजोरीत श्रीयंत्र ठेवा, लोकांना वाटेल तुमच्या नशिबाचा हेवा'; लक्ष्मीप्राप्तीसाठी वाचा सविस्तर माहिती!
वाचा संपूर्ण लेख
क्लिक करा