३० दिवस ‘या’ ७ मूलांकांना सुखाचे, भरघोस यश; पद-पैसा वाढेल, शुभ काळ!
आगामी काळ काही मूलांकांसाठी अतिशय उत्तम अन् शुभ-लाभदायक ठरणार आहे.
Numerology: ऑक्टोबर महिन्यात नवग्रहांपैकी ६ ग्रहांचे गोचर होणार आहे. या सहा ग्रहांचा गोचराचा राशींवर जसा प्रभाव पडेल, तसाच तो मूलांकांवरही पडू शकेल.
अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो. त्यावरून भविष्यकथन केले जाते. आगामी ३० दिवस कोणत्या मूलांकांना अतिशय चांगले जाऊ शकतात?
मूलांक १: कार्यक्षेत्रात प्रगती. प्रवासाचे शुभ परिणाम मिळतील. संपत्तीत वाढ शक्य. गुंतवणुकीतून आर्थिक लाभाच्या संधी. अनेक कामे पूर्ण होतील. उत्साहाचे दिवस.
मूलांक २: मान-सन्मानात वाढ. कामाच्या ठिकाणी प्रगती. कामे यशस्वी करु शकाल. सरकारी नोकरी मिळू शकते. प्रियजनांच्या सहवासात आनंददायी वेळ घालवाल.
मूलांक ३: आर्थिक लाभाची संधी. जुन्या गुंतवणुकीतून शुभ परिणाम मिळू शकतील. व्यावसायिकांसाठी फायदेशीर कालावधी. एखाद्या खास मित्राची भेट होऊ शकते.
मूलांक ४: आर्थिक लाभ. गुंतवणुकीतील प्रगती पाहून दिलासा. व्यापाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता. चांगला नफा मिळू शकेल. जीवनात आनंद येऊ शकेल.
मूलांक ५: परदेशात जाण्याची संधी. नोकरदारांनी केवळ कामांवर लक्ष द्यावे. वादापासून दूर राहावे. व्यावसायिक चांगली कामगिरी करून नफा कमावू शकतील.
मूलांक ६: यश मार्ग मोकळा. प्रगतीच्या शुभ संधी. सन्मान वाढेल. बचत करु शकाल. परदेशात जाण्याची संधी. मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा.
मूलांक ७: भावंडांच्या मदतीने अपूर्ण कामे पूर्ण कराल. एखाद्याचे बोलणे मनाला लागू शकते. कोणतीही नवीन गुंतवणूक तुम्हाला दीर्घकाळ लाभ देईल. नवीन मित्र होतील.
मूलांक ८: प्रगतीच्या संधी. पण सावध राहा. मोठे व्यवहार करू नका. नोकरदार, व्यावसायिक कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करतील. आर्थिक लाभाचे योग.
मूलांक ९: धनलाभाच्या शुभ संधी. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता. भावंडे, मित्र यांचे सहकार्य मोलाचे ठरू शकेल. नोकरदारांचे अधिकार वाढू शकतात.
- सदर माहिती सामान्य गृहितके, ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल.