न्यासा देवगणच्या कॉलेजच्या फीचा आकडा आहे कोटींच्या घरात
स्टारकीडच्या फीचा आकडा पाहून व्हाल हैराण
अजय देवगण आणि काजोलची लाडकी लेक न्यासा लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे.
न्यासा देवगण नेहमी चर्चेत येत असते.
न्यासा देवगणने धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. ही देशातील महागडी शाळा आहे.
शालेय शिक्षणानंतर न्यासा पुढील शिक्षणासाठी सिंगापूरमध्ये गेली. तिथे तिने युनायटेड वर्ल्ड स्कूल ऑफ साउथ ईस्ट एशिया शाळेतून हाईस्कूलचे शिक्षण घेतले.
काजोलने सांगितले की, न्यासाला शिक्षणासाठी सिंगापूरला पाठवणं खूप कठीण गेले होते. जास्त कठीण अजय देवगणला गेले होते. कारण तो नेहमीच मुलीच्या जास्त जवळ आहे.
रिपोर्ट्सनुसार, न्यासा सध्या स्वित्झर्लंडमधील ग्लिओन इंस्टिट्युट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये शिकते आहे. इथे तिची वर्षाची फी दीड कोटी रुपये आहे.
न्यासाच्या बॉलिवूडमधील पदार्पणाबद्दल अजय देवगण म्हणाला होता की, तिला पुढे काय करायचं आहे, हे माहित नाही. मात्र सध्या ती शिकते आहे.