Tap to Read ➤

गणेशोत्सवात लाभच लाभ; ‘या’ मूलांकांना लक्ष्मी-गणेशाचे वरदान, पाहा

काही मूलांकावर गणेशोत्सवात गणपतीसह लक्ष्मीची कृपा होऊ शकते.
अबालवृद्धांच्या लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. तयारी जवळपास पूर्णत्वाकडे गेली असल्याने केवळ गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागून राहिली आहे.
या गणेशोत्सवात अनेकविध शुभ योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच ग्रहस्थितीचा राशींसह मूलांकांवरही प्रभाव पडत असतो, असे म्हटले जाते.
अंकशास्त्रात मूलांकांवरु भविष्यकथन केले जाऊ शकते. गणेशोत्सवारंभ होत असून, कोणत्या मूलांकांना आगामी काळ उत्तम अनुकूल ठरू शकेल? पाहुया...
मूलांक १: आर्थिक लाभाची शुभ शक्यता आहे. विरोधकांवर विजय मिळवाल. गुंतवणुकीतून लाभ होतील. कामाच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे.
मूलांक २: कार्यक्षेत्रात प्रगतीची शुभ शक्यता. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल. करिअरमध्ये आवडीचे काम करू शकता. जीवनात आनंद आणि समृद्धी येईल.
मूलांक ३: आर्थिक लाभासाठी शुभ काळ. गुंतवणुकीतून चांगला नफा. कामाच्या ठिकाणी विनाकारण मतभेद निर्माण होऊ शकतात. जीवनशैलीत बरेच बदल शक्य.
मूलांक ४: समाजात प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात आनंद वाढेल. आर्थिक लाभ मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी यशाचा मार्ग मोकळा होईल. व्यवसायासाठी चांगला काळ.
मूलांक ५: प्रगतीसाठी शुभ संधी. महिलांकडून चांगला पाठिंबा. कामांत यशस्वी होऊ शकाल. आर्थिक लाभासाठी मजबूत स्थिती. गुंतवणुकीतून नफा वाढेल.
मूलांक ६: सामाजिक वर्तुळ वाढवण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी संवादाने समस्या सोडवाव्यात. आर्थिक लाभ होईल. आनंद, समृद्धीच्या शुभ संधी.
मूलांक ७: आगामी काळ अनुकूल राहील. नोकरीत प्रगती. मान-सन्मान वाढेल. यशाने आनंदी व्हाल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. कामात मदत होईल.
मूलांक ८: अधिक मेहनत करावी लागेल. यश मिळेल. आई-वडिलांची सेवा करण्याची संधी. एखाद्या विषयावर चर्चा शक्य. जीवनात आनंददायी काळ शक्य.
मूलांक ९: प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळेल. प्रयत्नातून यश मिळवाल. काही चांगली बातमी मिळू शकते. आदर वाढेल. गुंतवणुकीकडे लक्ष देण्याची गरज.
सदर माहिती सामान्य गृहितके, ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल.
क्लिक करा