चंद्राला टिपण्यासाठी आता सॅमसंग अल्ट्राची गरज नाही, 60x झूमचे दोन फोन
लाख-दीड लाखाचा फोन घेऊ शकत नाही, मग २०-३० हजारांत तुम्हाला दोन पर्याय आहेत....
नथिंगने नुकताच 3A आणि 3A Pro लाँच केला. या दोन्ही स्मार्टफोनवर आम्ही काम केले आहे. कॅमेरा, प्रोसेसर, फिचर्स आदी कसे आहेत, खरोखरच हे फोन तोडीचे आहेत का, आम्हाला हे दोन्ही फोन कसे वाटले, चला पाहुया...
सर्वप्रथम फोनमधील नथिंगची युआय तु्म्हाला पारंपरिक अँड्रॉईड फोनच्या युआयचा कंटाळा आला असेल तर तो घालवणारी आहे. नथिंगने नेहमीच्या वापरासाठी 3A बनविला आहे, तर कॅमेरा सेंट्रीक लोकांसाठी 3A Pro आणला आहे.
दोन्ही फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा कॉमन ५० मेगापिक्सल आहे, जो चांगले फोटो क्लिक करतो.
Phone 3A Pro हा थोडा वजनाने जास्त आहे. यामध्ये पेरिस्कोप Sony LYTIA 600 sensor कॅमेरा दिलेला आहे, ज्यात क्लोजअप फोटो चांगल्या दर्जाचे येतात. कलरही नॅचरल जाणवतात. याचे काही सॅम्पल आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत.
दोन्ही फोनमध्ये ६.७ इंचाचा अमोल्ड डिस्प्ले देण्यात आलेला आहे. रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ असल्याने व ब्राईटनेसही चांगला असल्याने उन्हात तसेच व्हिडीओ पाहताना लॅग जाणवत नाही.
नथिंगच्या या दोन्ही फोनमध्ये Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फ्लॅगशिप प्रोसेसर नसला तरी विविध अॅप वापरताना कुठेही लॅग जाणवत नाही. एका अॅपवरून दुसऱ्या अॅपवर जाणे एकदम फास्ट होते. तसेच कॅमेरा वापरताना किंवा फोन बराच वेळ वापरताना हिट होत नाही.
नथिंग फोन थ्री ए आणि थ्री ए प्रोमध्ये ५००० एमएएच बॅटरी दिली आहे. ही बॅटरी ५० वॉट चार्जरला सपोर्ट करते. मुख्यत: हा चार्जर तुम्हाला बॉक्ससोबत येत नाही. तुम्हाला वेगळा खरेदी करावा लागतो. ही बॅटरी मध्यम वापराला दीड दिवस पुरते.
सॉफ्टवेअरमध्ये कुठेही लॅग नाही, वेगळी मांडणी आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे वैताग आणणाऱ्या कुठल्याही अॅड नाहीत किंवा ब्लोटवेअर नाही, हे एक नथिंगने चांगले केले आहे. पारंपरिक रिंगटोनपेक्षा वेगळी रिंगटोन, मेसेज टोन यात देण्यात आल्या आहेत.
Phone 3A Pro चा सेल्फी कॅमेरा हा ५० मेगापिक्सलचा आहे, जो अत्यंत क्लिअर फोटो कॅप्चर करतो. ज्या लोकांना सेल्फी आणि पोर्ट्रेट मोडवर फोटो काढायची आवड आहे, त्यांच्यासाठी हा फोन चांगला आहे. तर Phone 3A मध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. जो चांगले सेल्फी घेतो. अल्ट्रावाईड कॅमेरा देखील चांगले डिटेल देतो.
सिक्युरिटी अपडेट्स...
आज पैशांचे व्यवहार हे स्मार्टफोनवरूनच केले जातात. यामुळे तुमची आर्थिक सुरक्षेबरोबरच डेटाची सुरक्षा खूप महत्वाची आहे. नथिंगने तीन वर्षे अँड्रॉईड अपडेट्स आणि सहा वर्षांचे सिक्युरिटी अपडेट देण्याचा दावा केला आहे.