ना रोहित ना कोहली! कसोटीत एका डावात सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज
आघाडीच्या ५ फलंदाजांच्या यादीत दोन भारतीय बॅटरचा समावेश
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक चौकार मारण्याचा रेकॉर्ड हा इंग्लंडच्या जॉन एडरिच या दिग्गजाच्या नावे आहे. १९६५ मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातील ३१० धावांच्या खेळीत त्याने ५२ चौकार मारले होते.
या खास क्लबमध्ये भारताचा माजी स्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवागचाही समावेश आहे.
सेहवागनं पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यातील २५४ धावांच्या खेळीत सेहवागच्या भात्यातून ४७ चौकार पाहायला मिळाले होते.
क्रिकेटमधील 'डॉन' ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ब्रॅडमन यांनी १९३० मध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ३३४ धावांची खेळी करताना ४६ चौकार मारले होते.
ब्रायन लारानं ३७५ धावांच्या खेळीत ४५ चौकार मारण्याचा रेकॉर्ड आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मण याची २८१ धावांची अविस्मरणीय खेळी ही ४४ चौकारांनी बहरली होती.
श्रीलंकेच्या महेला जयवर्धने याने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या लढतीत सर डॉन ब्रॅडमन, ग्रीम पोलक, ग्राहम गूच आणि ब्रायन लारा यांच्या एका डावातील ४३ चौकारांच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती.