Tap to Read ➤

२५००० चा दंड, तीन वर्षे शिक्षा अन् लायसन रद्द! वाहतुकीचे नवे नियम...

वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी केंद्र सरकार नियम कठोर करत आहे, तरीही लोक हे नियम पाळत नाहीत.
देशात रस्ते अपघात वाढतच चालले आहेत. वाहने कशीही चालविली जात आहेत. त्यात कार कंपन्या सेफ्टी फिचर्सकडे लक्ष देताना दिसत नाहीएत. अनेक कंपन्यांच्या कारना झिरो सेफ्टी रेटिंग मिळालेली आहे.
लोकही तसा विचार करताना दिसत नाहीत. अशा कार पाण्यासारख्या विकण्यात कंपन्या यशस्वी होत आहेत. अशातच लोकही वाहतुकीचे नियम पाळताना दिसत नाहीत. यामुळे अपघात वाढत आहेत. वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी केंद्र सरकार नियम कठोर करत आहे, तरीही लोक हे नियम पाळत नाहीत.
वाहतुकीचे नियम कठोर करण्यासाठी केंद्र सरकराने मोटर व्हेईकल अॅक्टमध्ये मोठे बदल केले आहेत. यामध्ये नियम मोडल्यास आधीच्या दंडाच्या रकमेत १० पटींनी वाढ केली आहे. तसेच अल्पवयीनांनी वाहन चालविल्यास त्यांच्यासह पालकांनाही मोठी शिक्षा आणि दंडाची सोय करण्यात आली आहे.
अल्पवयीन व्यक्ती गाड़ी चालविताना किंवा अपघात करताना सापडला तर त्याच्या पालकांना २५००० रुपयांचा दंड केला जाणार आहे. सोबत ३ वर्षांसाठी तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
तसेच अल्पवयीनाने वापरलेल्या वाहनाचे रजिस्ट्रेशन १ वर्षासाठी निलंबित केले जाणार आहे. अल्पवयीन व्यक्तीला त्याच्या वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन दिले जाणार नाही, असे कठोर दंड, शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
जर एखादी व्यक्ती दारू पिऊन गाडी चालवताना आढळली तर त्याला १०,००० रुपयांपर्यंत दंड आणि ६ महिन्यांची तुरुंगवास होऊ शकतो, तर दुसऱ्यांदा दंड १५,००० रुपयांपर्यंत वाढेल आणि तुरुंगवासाची शिक्षा २ वर्षांपर्यंत वाढेल.
हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्यास आता १००० रुपये दंड आणि ३ महिन्यांसाठी परवाना रद्द करण्याची तरतूद आहे. सीट बेल्ट न लावता गाडी चालवल्यास १००० रुपये दंड आकारला जाणार आहे.
मोबाईल फोनवर बोलत गाडी चालवल्यास ५००० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवण्याचा दंड ₹५००० आणि विमा नसल्याबद्दल ₹२००० पर्यंत वाढवण्यात आला आहे.
ट्रॅफिक सिग्नल तोडल्यास आता ₹५००० दंड आकारला जाईल, जो पूर्वी फक्त ₹५०० होता. यामुळे आता वाहतुकीचे नियम पाळावे लागणार आहेत. तुम्ही देखील पाळा आणि तुमच्या मित्र, मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना देखील पाठवा.
क्लिक करा