Tap to Read ➤
नेहा कक्कर स्टेजवर ढसाढसा रडली कारणं...
परदेशात कॉन्सर्टसाठी गेलेल्या नेहा कक्करला भर स्टेजवर रडू फुटले, प्रेक्षक म्हणाले - चालती हो!
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर तिच्या गाण्यांसाठी नेहमीच चर्चेत असते.
नेहा सोशल मिडीयावर नेहमीच खूप ॲक्टिव्ह असते. तिचे व्हिडिओ दररोज सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात.
सध्या तिचा मेलबर्नमधील कॉन्सर्टमधील असाच एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये नेहा कॉन्सर्टमधील स्टेजवर ढसाढसा रडताना दिसत आहे.
नेहा या कॉन्सर्टमध्ये चक्क ३ तास उशिरा पोहोचली होती.
तीन तास उशिरा पोहोचल्याबद्दल तिच्या चाहत्यांची तिने मनापासून माफी मागितली.
या व्हिडिओमध्ये, अनेक प्रेक्षक नेहाला वाट पाहायला लावल्याबद्दल टीका करताना पाहायला मिळत आहेत.
क्लिक करा