नवरात्र शुक्रवार: ४ राशींवर महालक्ष्मी कृपा; भाग्योदय, अपार लाभ-पैसा!
नवरात्रात शुक्रवारी चतुर्ग्रही योग जुळून आलाय. ४ राशींवर लक्ष्मीकृपा होईल.
नवरात्र सुरू आहे. शुक्रवार हा देवीसाठी समर्पित असल्याची मान्यता असल्यामुळे नवरात्रातील शुक्रवारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
नवरात्रातील शुक्रवारी तूळ राशीत सूर्य, बुध, मंगळ आणि केतु यांचा चतुर्ग्रही योग जुळून आला आहे. यासह रवि, सुकर्मा आणि पूर्वाषाढा नक्षत्राचा योग जुळून आला आहे.
या ग्रहस्थितीसह महालक्ष्मी देवीची अपार कृपा, धन-धान्य वृद्धी वैभव प्राप्ती ४ राशींना होऊ शकते, असे सांगितले जात आहे. भाग्यवान ४ राशी कोणत्या? पाहुया...
मेषः नवरात्राचा शुक्रवार अतिशय लाभदायक ठरेल. मन प्रसन्न होईल. कामाचे कौतुक होईल. आर्थिक लाभ होईल. नोकरीत यश मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. श्रीसुक्ताचे पठण करावे.
मिथुनः सुखद दिवस. विरोधक पराभूत होतील. प्रतिष्ठा वाढेल. मन प्रसन्न होईल. व्यवसायात नफा होईल. धनलाभ योग. देवी लक्ष्मीला लाल फूल अर्पण करुन पूजन करावे.
कर्कः फायदा होईल. अडकलेला पैसा मिळेल. खरेदी कराल. चांगली बातमी मिळेल. आनंददायी घटना घडतील. कामात यश मिळेल. ॐ श्रीं श्रीये नमः मंत्राचा जप करावा.
सिंहः उत्तम दिवस. नोकरीत अनुकूलता. धनबचतीत यश. जोडीदाराशी नाते मजबूत. धनलाभासह भाग्योदय. लाभ मिळतील. लक्ष्मी देवीचे पूजन, मंत्रजप यथाशक्ती करावा.
- सदर माहिती सामान्य गृहीतके, ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरेल.