Tap to Read ➤

नॅटली ते हरमनप्रीत WPL च्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या ५ बॅटर

टॉप ५ मध्ये भारताच्या लेडी सेहवागचाही लागतो नंबर
इंग्लंडची महिला क्रिकेटर नॅटली सायव्हर ब्रंट हिने मुंबईच्या ताफ्यातून एलिमिनेटरच्या लढतीत ४१ चेंडूत ७७ धावांची दमदार खेळी केली.
गुजरात विरुद्धच्या सामन्यातील अर्धशतकी खेळीस तिने मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचललाच. पण याशिवाय ती पेरीला मागे टाकत आता वुमन्स प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारी बॅटरही ठरलीये.
यंदाच्या हंगामातील ४९३ धावांसह तिच्या खात्यात आता ९९७ धावांची नोंद झालीये. या स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या बॅटरमध्ये ती अव्वलस्थानावर आहे.
आरसीबीच्या ताफ्यातून खेळणारी एलिसा पेरी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिच्या खात्यात ९७२ धावांची नोंद आहे.
WPL मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारी मेग लेनिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारताची शफाली वर्मा हिने आतापर्यंत WPL मध्ये ८६१ धावा केल्या असून ती या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर ही देखील ७८५ धावांसह टॉप ५ मध्ये आहे.
क्लिक करा