SIP मधून व्हाल कोट्यधीश, १५ हजारांची गुंतवणूक करेल मालामाल
आपण श्रीमंत व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण यासाठी पैसे योग्य ठिकाणी गुंतवणं आवश्यक असतं.
पैसे योग्यरित्या गुंतवले तर ते वाढतात. परंतु विना स्मार्ट स्ट्रॅटजी ही सोपं नाही. परंतु एसआयपीद्वारे कोट्यधीश बनता येऊ शकतं.
जर तुम्हाला १५ वर्षात कोट्यधीश व्हायचं असेल तर म्युच्युअल फंडाचा एसआयपी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला १५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल.
जर तुम्ही १५ वर्षांसाठी महिन्याला १५ हजारांची गुंतवणूक केली आणि १५ टक्के व्याज मिळालं, तर अखेरिस तुम्हाला १,००,२७,६०१ रुपये मिळतील.
तुम्ही १५ वर्षांत २७ लाखांची गुंतवणूक कराल. जर १५ टक्के व्याज मिळाल्यास व्याजाच्या रुपात तुम्हाला ७३ लाख रुपये मिळतील.
जर तुम्ही आणखी १५ वर्षांसाठी गुंतवणूक सुरू ठेवली, तर ३० वर्षांनंतर तुमच्याकडे १०.३८ कोटी रुपयांचा फंड जमा होईल.
यामध्ये तुमची गुंतवणूक केवळ ५४ लाख असेल. तुम्हाला व्याजाच्या स्वरूपात ९.८ कोटी रुपये मिळतील.
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. म्युच्युअल फंडात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.