होळी: 'या' स्कीममध्ये १० हजारांची करा गुंतवणूक, मिळू शकतील २.५२ कोटी
होळीच्या निमित्तानं तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूकीचा श्रीगणेशा करू शकता.
आजकाल अनेक जण गुंतवणूकीकडे वळत आहेत. होळीच्या निमित्तानं तुम्ही एखाद्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार एका चांगल्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक सुरू करू शकता.
एसआयपीमध्ये तुम्ही महिन्याला १० हजारांची गुंतवणूक करू शकता. यानंतर तुम्हाला ३० वर्ष सातत्यानं हे करावं लागेल.
गुंतवणूकीच्या कालावधीदरम्यान, तुम्हाला किमान ११ टक्क्यांचा अंदाजे परतावा मिळेल अशी अपेक्षा करावी लागेल.
जर तुम्हाला यात अपेक्षेप्रमाणे परतावा मिळाला तर, तुम्ही ३० वर्षांनंतर जवळपास २,५२,८२,८२१ रुपये जमवू शकता.
टीप - म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.