गुजरातमध्ये ट्रीपमध्ये काय काय बघाल?

गुजरात फिरायला जात असाल, तर 'या' ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका.

भारतातील ऐतिहासिक राज्यांपैकी एक असलेले गुजरात, तिथल्या पर्यटन स्थळांसाठी  प्रसिद्ध आहे.

सोमनाथ मंदिर : भव्यता आणि श्रद्धेचा संगम असलेल्या या ठिकाणाचे सुंदर समुद्राचे दृश्य मन मोहून टाकते.

कच्छचे रण : जगप्रसिद्ध पांढऱ्या वाळवंटातील रण उत्सव गुजराती संस्कृतीची ओळख करून देतो.

गीर उद्यान : आशियाई सिंहाचे घर असलेल्या या जंगलात तुम्ही सफारीचा अनुभव घेऊ शकता. 

साबरमती आश्रम : महात्मा गांधींच्या साधेपणाची झलक दाखवणारे हे संग्रहालय तुम्हाला इतिहासाच्या पानांवर घेऊन जाईल.

द्वारका : भगवान कृष्णाच्या शहरातील मंदिरे आणि येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करणारे आहे. 

लक्ष्मी विलास पॅलेस : शाही वैभव आणि स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेला हा महल नक्की बघा. 

तुम्ही ही सहल आणखी अविस्मरणीय बनवण्यासाठी गुजरातमधील खाद्य पदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

Click Here