लग्नापूर्वी तुमच्या पार्टनरला नक्की विचारा 'हे' प्रश्न
लग्न करताय? मग पार्टनरविषयी काही महत्त्वाची गोष्टी माहित करुन घेणं गरजेचं आहे.
लग्न करणं ही प्रत्येकाच्या आयुष्यातील मोठी गोष्ट आहे. त्यामुळे लग्नानंतर काही गोष्टींची जबाबदारीही आपोआप खांद्यावर येते.
जर तुम्ही लग्न करत असाल किंवा तुमचं लग्न ठरलं असेल तर लग्नापूर्वी तुमच्या पार्टनरला हे काही बेसिक प्रश्न नक्की विचारा.
लग्नापूर्वी दोन्ही पार्टनरने एकत्र बसून एकमेकांच्या फायनांशिअल बाबींवर चर्चा केली पाहिजे. गुंतवणूक, खर्चाचं नियोजन एकमेकांना क्लिअर केलं पाहिजेत. ज्यामुळे लग्नानंतर तुमच्यात वाद होणार नाहीत.
लग्नानंतर फॅमेली प्लॅनिंग कसं असावं यावरही चर्चा करावी. लग्नानंतर तुम्हाला मूल कधी हवंय, तुमचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे हे डिस्कस करावं.
लग्नापूर्वी दोन्ही पार्टनरला एकमेकांच्या कुटुंबियांविषयी, त्यांच्या स्वभावाविषयी सविस्तर माहिती देणं गरजेचं आहे. ज्यामुळे वेळप्रसंगी एकमेकांच्या कुटुंबियांना कसं हँडल करावं हे पार्टनर्सला कळेल.
जर तुम्ही दोघेही वर्किंग असाल तर घरातील कामाचं,जबाबदाऱ्यांचं नियोजन कसं करायचं हे आधीच ठरवा.
दोघांनीही एकमेकांच्या करिअरविषयी चर्चा करा. त्यांना नोकरी करायची आहे की बिझनेस हे पहा. तसंच त्यामध्ये तुम्ही कसा सपोर्ट करु शकता हे देखील सांगा.
मिरची कापल्यानंतर होतीये हातांची जळजळ? करा हे उपाय