सौंदर्याची आगळीवेगळी व्याख्या, विचित्र पद्धतीने छेदले जातात ओठ अन् कान
Women Cuts Lips And Ears: सुंदर दिसण्यासाठी लोक खूप काही करतात. पण जगात एक अशी जागा आहे, जिथे लोक सौंदर्यासाठी आपले ओठ आणि कान कापतात.
Women Cuts Lips And Ears: जगात प्रत्येकाची सौंदर्याची व्याख्या वेगळी आहे. काहींना मेक-अप करुन सुंदर दिसायचे असते, तर काहींना मेक-अपविना स्वतःला राहायला आवडते.
महिलांसाठी तर सौंदर्य खूप महत्वाचे आहे. लिपस्टिक, मेकअप अन् दागिने घालून त्या स्वतःला सुंदर बनवतात. पण स्त्रियांचे ओठ आणि कान कापले तर, सौंदर्याची व्याख्या काय असेल?
जगात विविध प्रकारचे लोक राहतात.
प्रत्येकाच्या चालीरीती, परंपरा वेगवेगळ्या आहेत. पण ओठ आणि कान कापणाऱ्या महिलांबद्दल तुम्ही क्वचितच ऐकले असेल. आफ्रिकेच्या इथिओपियातील मुर्सी जमात हे याचे उदाहरण आहे.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
शहरांमध्ये महिला लिपस्टिक लावून ओठांचे सौंदर्य वाढवतात, तर मुर्सी जमातीत मुली आपले ओठ कापून सुंदर बनवतात. या जमातीत असे मानले जाते की, ज्या मुलीचे ओठ जास्त लटकते, ती अधिक सुंदर आहे.
पण, यांची ही फॅशन सोपी नाही. खालच्या ओठांना लटकण्याची प्रक्रिया खूप वेदनादायक आहे. मुली लहान होताच त्यांचे खालचे ओठ टोचले जातात आणि त्यात हळूहळू एक गोल डिस्क घातली जाते.
या डिस्कचा आकार वेळोवेळी वाढत जातो. यामुळे ओठ लटकायला लागतात. ही प्रक्रिया खूप वेदनादायक आहे, तरीही या जमातीच्या महिला वेदना सहन करतात. याचप्रमाणे त्यांच्या कानाचा खालचा भागही कापला जातो.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती