Tap to Read ➤

जबरदस्ती रंग लावणे, तसली गाणी वाजवण्यावर पोलिसांची बंदी

होळीसाठी मुंबई पोलिसांची नियमावली
मुंबई पोलिसांनी होळी, होलिका दहन आणि इतर होळीशी संबंधित कार्यक्रमांसाठी कडक सूचना जारी केल्या आहेत.
या सूचना १२ ते १८ मार्च २०२५ पर्यंत लागू असणार आहेत. रमजानचा महिना लक्षात घेऊन ही खबरदारी घेण्यात आली आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांनी यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले असून, सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही कृत्यावर कारवाई केली जाणार आहे.
मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्यास कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.
रंगीत पाणी फेकणे, आक्षेपार्ह भाषा किंवा घोषणांमुळे तणाव आणि सार्वजनिक अशांतता निर्माण होऊ शकते, असे पोलिसांनी म्हटलं आहे.
पाण्याचे फुगे फेकणे, जबरदस्तीने रंग लावणे किंवा पादचाऱ्यांवर रंगीत पाणी फवारणे यावरही सक्त मनाई आहे.
याशिवाय होळी साजरी करण्यासाठी बळजबरीने देणगी गोळा करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करण्यात येणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी बीभत्स गाणी वाजवण्यावर तसेच आक्षेपार्ह घोषणा देण्यावर पोलिसांनी बंदी आणली आहे.
क्लिक करा