Tap to Read ➤

मुंबई इंडियन्सनं चुकूनही करू नये या तिघांना रिटेन करण्याची चूक

MI नं या तिघांवर डाव खेळण्याआधी शंभर वेळा विचार करावा
आयपीएलच्या आगामी हंगामासाठी मेगा लिलाव होणार आहे. यासाठी फ्रेंचायझी संघाने आतापासून संघ बांधणीच्या रणनितीला सुरुवात केली असेल.
पाच वेळचा चॅम्पियन संघ असणाऱ्या मुंबई इंडियन्सकडून यावेळी कशी संघ बांधणी केली जाते याकडे सर्वांचे लक्ष असेल.
इथं आपण जाणून घेऊयात मुंबई इंडियन्सनं खेळाडू रिटेन करताना कोणत्या खेळाडूंवर डाव खेळण्याची चूक करू नये, यासंदर्भातील खास स्टोरी
मुंबई इंडियन्सच्या संघाने पोलार्डच्या रिप्लेसमेंटच्या रुपात टिम डेविडवर मोठा डाव खेळला होता.
पण गत हंगामात त्याला नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले. त्याने १३ सामन्यात फक्त २४१ धावा केल्या. त्याला रिटेन करणं फायद्याचा सौदा ठरणार नाही.
त्याच्याशिवाय या यादीत ईशान किशनचंही नाव येते. हा एक आक्रमक फलंदाज आहे. डावाला दमदार सुरुवात करुन देण्याची क्षमताही त्याच्यात आहे.
ईशान किशनमध्ये क्षमता असली तरी सातत्याच्या अभावामुळे या खेळाडूवर पुन्हा भरवसा दाखवणं मुंबई इंडियन्सला गोत्यात आणणारे ठरू शकते.
रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. फक्त खेळाडूच्या रुपात त्याला संघासोबत रिटेन करणं हा निर्णयही मुंबई इंडियन्ससाठी फारसा फायदेशीर ठरेल, असे वाटत नाही.
क्लिक करा