रिलायन्स पेट्रोल पंपचे डीलर बनून तुम्ही मोठी कमाई करू शकता.
तुम्हाला पेट्रोल पंप उघडून मोठी कमाई करायची असेल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पेट्रोल पंप उघडण्याची संधी देत आहेत.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
कंपनीचे देशभरात 64,000 हून अधिक पेट्रोल पंप आहेत, त्यापैकी 1300 स्पेशल सर्व्हिसेससोबत सुपीरिअर टेक्नोलॉजी फ्युअल पुरवतात. जाणून घ्या रिलायन्सचे पेट्रोल पंप डीलर कसे बनू शकता.
सर्वप्रथम Jio-BP https://partners.jiobp.in/ च्या अधिकृत लिंकवर जा. तुमचे नाव, मेल आयडी, मोबाईल नंबर, व्यवसाय, वार्षिक कमाई, जागेचा आकार, इत्यादी भरुन अर्ज करा.
कंपनी तुम्ही भरलेला फॉर्म तपासेल आणि पुढील प्रक्रियेसाठी अर्जदाराशी संपर्क साधेल. अर्जदाराला पेट्रोल पंपाच्या बांधकामासाठी कच्चा माल, बांधकाम साहित्य, फर्निचर, इत्यादी दाखवावे लागेल.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
मुकेश अंबानींच्या कंपनीचा पेट्रोल पंप उघडण्यासाठी तुमच्याकडे किमान 800 स्क्वेअर फूट जागा आणि 3 पंप व्यवस्थापक असावेत. यासाठी किमा किमान 70 लाख रुपयांचे बजेट लागणार आहे.
जर तुम्ही हायवेवर पंप उघडत असाल, तर त्यासाठी किमान 1500 स्क्वेअर फूट जमीन, हवा भरण्यासाठी 2 कामगार आणि पेट्रोल भरण्यासाठी किमान 8 कामगार असणे आवश्यक आहे.
बजेटबद्दल सांगायचे तर, पंप उघडण्यासाठी तुम्हाला मालकिची किंवा भाड्याची जमीन, 23 लाख रुपये रिफंडेबल डिपॉझिट आणि 3.5 लाख रुपये स्वाक्षरी शुल्क लागेल.