Tap to Read ➤

भारत-इंग्लंड यांच्यातील वनडेत सर्वाधिक धावा करणारे आघाडीचे ७ फलंदाज

टॉप ५ मध्ये एकही इंग्लंडचा बॅटर दिसत नाही.
महेंद्रसिंह धोनीनं २००६ ते २०१९ या कालावधीत इंग्लंड विरुद्ध ४८ सामन्यातील ४४ डावात १५४६ धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत युवराज सिंग दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ३७ सामन्यातल ३६ डावात ४ शतक आणि ७ अर्धशतकासह १५२३ धावा काढल्या आहेत.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं इंग्लंड विरुद्ध ३७ सामन्यातील ३७ डावात २ शतके आणि १० अर्धशतकासह १४५५ धावा केल्या आहेत.
विराट कोहली या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. इंग्लंड विरुद्धच्या ३६ वनडे सामन्यातील ३६ डावात त्याने ३ शतके ९ अर्धशतकासह १३४० धावा केल्या आहेत.
टॉप ५ मध्ये सुरेश रैनाच्या नावाचाही समावेश आहे. त्याने इंग्लंड विरुद्धच्या ३७ वनडेतील ३२ डावात १ शतक आणि १२ अर्धशतकासह १२०७ धावा केल्या आहेत.
इंग्लंडच्या इयान बेलचा या यादीत सहाव्या क्रमांकावर नंबर लागतो. भारतीय संघाविरुद्धच्या वनडेतील ३१ सामन्यातील ३१ डावात २ शतके आणि ६ अर्धशतकासह त्याने ११६३ धावा केल्या आहेत.
भारत-इंग्लंड यांच्यातील वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पीटरन सातव्या क्रमांकावर आहे. त्याने २८ वनडेतील २८ डावात २ शतके आणि ६ अर्धशतकाच्या मदतीने ११३८ धावा केल्या आहेत.
क्लिक करा