Tap to Read ➤

T20I मध्ये कुणाच्या कॅप्टन्सीत टीम इंडियानं गमावल्या सर्वाधिक मॅचेस?

आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये कोणाच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाला करावा लागला सर्वाधिक पराभवाचा सामना? जाणून घेऊयात कॅप्टन्सीच्या रेकॉर्ड्सची गोष्ट
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघाकडून सर्वाधिक सामन्यात कॅप्टन्सी केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ७२ सामन्यात टीम इंडियालार २८ पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय एक मॅच बरोबरीत सुटल्याचा रेकॉर्ड आहे.
विराट कोहलीनं आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५० सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले असून त्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाने १६ सामने गमावल्याचा रेकॉर्ड आहे. याशिवाय दोन सामने बरोबरीत राहिले होते.
रोहित शर्मा हा टी-२० क्रिकेटमधील विनिंग पर्सेंटेजच्या बाबतीत सर्वात आघाडीवर असणारा कॅप्टन ठरला. ६२ सामन्यात संघाचे नेतृत्व करताना त्याच्या पदरी १२ पराभव आले. एक सामना अनिर्णित राहिला.
हार्दिक पांडयानं १६ सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. यात टीम इंडियाने १० सामने जिंकले असून ५ पराभवासह एक सामना बरोबरीत राहिल्याचे पाहायला मिळाले.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली पहिल्या २० सामन्यात टीम इंडियाला ४ पराभव अन् एक मॅच टाय झाल्याचा रेकॉर्ड आहे.
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ३ पैकी २ सामन्यात पराभवाचा सामान केला होता.
रिषभ पंतनेही ५ सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाला दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
क्लिक करा