Tap to Read ➤

Uncapped Player नियमानुसार MS धोनीसह हे ५ खेळाडू होऊ शकतील रिटेन

एक नजर अनकॅप्ड नियमानुसार लिलावाधी रिटेन होऊ शकतील अशा खेळाडूंवर
आयपीएलच्या मेगा लिलावाआधी चेन्नई सुपर किंग्सचा संघ महेंद्रसिंह धोनीला अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात आपल्या ताफ्यात सामील करू शकतो, अशी चर्चा रंगू लागली आहे.
MS धोनीशिवाय अनकॅप्ड खेळाडूसंदर्भातील नियमाअंतर्गत मागील पाच वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असणाऱ्या आणखी काही भारतीय स्टार्संवर फ्रँचायझी संघ डाव लावू शकतात.
एक नजर भारतीय संघाकडून खेळल्यानंतर  आयपीएलच्या आगामी हंगामात अनकॅप्ड गटात मोडणाऱ्या खेळाडूंवर
संदीप शर्मा हा भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१५ मध्ये खेळला होता. त्यामुळे आगामी आयपीएल स्पर्धेत तो अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात पहिली पसंती ठरू शकतो.
भारताचा जलदगती गोलंदाज मोहित शर्मानं गत हंगामात आपल्या गोलंदाजीनं मोहित केलं होतं. २०१५ मध्ये तो टीम इंडियाकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तो आता अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत आहे.
३३ वर्षीय विजय शंकरही २०१९ मध्ये टीम इंडियाकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यामुळे अनकॅप्ड प्लेयरच्या यादीत त्याचाही समावेश होतो.
३५ वर्षीय पियूष चावला २०१२ मध्ये टीम इंडियाकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता. मुंबई इंडियन्स पुन्हा त्याच्यावर भरवसा दाखवत अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात रिटेन करणार का? ते पाहण्याजोगे असेल.
क्लिक करा