Tap to Read ➤

MS धोनी 'व्हिंटेज' लुकमध्ये परतला; बॉलिवूडचे हिरो माहीसमोर पडतील फिके

महेंद्र सिंह धोनी आपल्या जुन्या लुकमध्ये परत आला आहे. आगामी IPL मध्ये तो हाच लुक कॅरी करण्याची शक्यता आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याच्या हेअरस्टाईलमुळे खूप चर्चेत असतो.
धोनी नेहमी वेगवेगळ्या हेअरस्टाईल करतो. IPL 2023 पासून धोनीने केस वाढवायला सुरुवात केली होती.
आता त्याचे केस खूप वाढले असून, चाहत्यांना माहीच्या जुन्या 'व्हिंटेज' हेअरस्टाईलची आठवण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तेव्हा धोनीचे केस लांब होते. काही काळानंतर त्याने केस कापले आणि पुन्हा वाढले नाहीत.
निवृत्तीच्या काही वर्षांनंतर माहीने पुन्हा एकदा त्याची तीच लोकप्रिय विंटेज हेअरस्टाईल पुन्हा ठेवली आहे.
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट अलीम हकीमने धोनीला हा नवा लूक दिला आहे. आलिमने इन्स्टाग्रामवर माहीचा नवीन लूक शेअर केला आहे.
अलीम हकीमने शेअर केलेल्या फोटोंमध्ये धोनी काळा टी-शर्ट आणि काळा चष्मा घातलेला दिसत आहे.
धोनीच्या नवीन लूकवर अभ‍िनेता अन‍िल कपूर, रणवीर सिंह, अपारशक्त‍ी खुराना, हार्डी संधूसह अनेकांनी कमेंट केली आहे.
क्लिक करा