Jaya Kishori यांची नेटवर्थ किती, १ कथेसाठी किती पैसे घेतात माहितीये?
मोटिव्हेशनल स्पिकर जया किशोरी यांचे फॉलोअर्स केवळ भारतातच नाही, तर परदेशातही आहेत.
मोटिव्हेशनल स्पिकर जया किशोरी यांचे फॉलोअर्स केवळ भारतातच नाही, तर परदेशातही आहेत. अगदी सोशल मीडियावरही त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.
त्यांचे मोटिवेशनल व्हिडिओजदेखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. जया किशोरी यांच्या कथेचा कार्यक्रम ठेवायचा असेल तर त्या किती फी घेतात हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते.
वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षीच त्यांनी अध्यात्माच्या वाटेवर चालण्यास सुरुवात केली होती.
वयाच्या ९ व्या वर्षी तेव्हा त्यांनी संस्कृत भाषेतून शिव तांडव स्तोत्र, रामाष्ठ्कम, लिंगाष्ठ्कम आणि इतरही काही स्तोत्रांचे पठण करायला सुरुवात केली होती.
जया किशोरी यांचा जन्म १३ जुलै १९९५ रोजी प.बंगालमधील कोलकात्यात झाला. त्यांचं खरं नाव जया शर्मा असे आहे.
जया किशोरी यांना किशोरी ही पदवी त्यांच्या गुरुंनी दिली आहे. त्या स्वर्गीय गुरु श्री रामसुखदासजी महाराज आणि भगवद आचार्य विनोद कुमारजी सहल यांना गुरु मानतात.
माध्यमांतील वृत्तांनुसार, जया किशोरी या एका कार्यक्रमासाठी ९ लाख रुपये एवढी फीस घेतात.
याचा जवळपास अर्धा हिस्सा म्हणजेच ४.५० लाख कथेपूर्वी घेतात आणि उरलेली फी कथा झाल्यानंतर घेतात. वृत्तांनुसार, त्यांच्या फीसचा एक मोठा हिस्सा नारायण सेवा संस्थेसाठी दान करण्यात येतो.
याशिवाय जया किशोरी यूट्यूब व्हिडीओज, अल्बम्स आणि मोटिवेशनल स्पीचच्या माध्यमातूनही कमाई करतात. माध्यमांतील वृत्तांनुसार जया किशोरी यांची नेटवर्थ १.५ ते २ कोटी रुपये एवढी आहे