Tap to Read ➤

'सूर्या'नंं बटलरला टाकलं मागे; T20I त सर्वाधिक सिक्सर मारणारे ५ फलंदाज

टॉप ५ मध्ये दोन भारतीयांचा समावेश
बांगलादेश विरुद्धच्या ग्वाल्हेर टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादव याने छोट्याखानी खेळीत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात १४ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २९ धावांची खेळी केली.
आपल्या खेळीतील ३ षटकारासह त्याने इंग्लंडच्या जोस बटलरचा विक्रम मागे टाकला आहे. टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता चौथ्या स्थानावर पोहचला आहे.
एक नजर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या आघाडीच्या ५ फलंदाजांवर
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा हिटमॅन रोहित शर्माच्या नावे आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत २०५ षटकार मारल्याचे पाहायला मिळाले.
मार्टिन गप्टिल या यादीत १७३ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आघाडीची दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरन १४४ षटकारांसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सूर्यकुमार यादव १३९ षटकारांसह या यादीत चौथ्या स्थानावर असून बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत तो निकोलस पूरनलाही मागे टाकू शकतो.
इंग्लंडचा बॅटर जोस बटलरच्या खात्यात १३७ षटकारांची नोंद आहे.
क्लिक करा