चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप ५ मध्ये २ भारतीय
इथं एक नजर टाकुयात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या फलंदाजांच्या खास रेकॉर्ड्सवर
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांमध्ये दोन भारतीय बॅटर्सचा समावेश आहे. या दोघांनी आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये.
इथं एक नजर टाकुयात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या फलंदाजांच्या खास रेकॉर्ड्सवर
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा कॅरेबियन स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावे आहे. १७ सामन्यातील १७ डावात गेलनं ३ शतके आणि एका अर्धशतकासह ७९१ धावा केल्या आहेत.
या यादीत श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेचा दुसरा नंबर लागतो. २२ सामन्यातील २१ डावात जयवर्धने याने ५ अर्धशतकाच्या मदतीने ७४२ धावा केल्या आहेत.
भारताचा माजी क्रिकेटर शिखर धवन याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवली आहे. १० सामन्यातील १० डावात ३ शतके आणि ३ अर्धशताकसह त्याने ७०१ धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करण्यात तो तिसऱ्या क्रमांकावर असला तरी सर्वोत्तम सरासरीच्या बाबतीत तो अव्वलस्थानी आहे.
श्रीलंकेच्या कुमार संगकारानं २२ सामन्यातील २१ डावात १ शतक आणि ४ अर्धशतकाच्या मदतीने या स्पर्धेत ६८३ धावा ठोकल्या आहेत.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली या यादीत टॉप ५ मध्ये आहे. त्याने १३ सामन्यातील ११ डावात ३ शतकं आणि ३ अर्धशतकाच्या मदतीने ६६५ धावा केल्या आहेत.