Tap to Read ➤
वनडेत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या टॉप ५ बॅटरमध्ये दिसतो भारतीयांचा जलवा
वनडेतील शतकी रेकॉर्ड्सच्या यादीत पहिल्या तीन स्थानावर भारतीय फलंदाज मग लागतो परदेशी बॅटर्सचा नंबर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०० शतकांचा रेकॉर्ड हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलरच्या नावे आहे. पण वनडेत सर्वाधिक शतकाचा किंग हा कोहली आहे.
वनडेत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांच्या यादीत पहिल्या तीन स्थानावर भारतीय फलंदाजांचा जलवा दिसून येतो. एक नजर या रेकॉर्ड्सवर
वऩडेत सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड हा विराट कोहलीच्या नावे आहे. त्याने २९६ वनडे सामन्यात ५० शतके झळकावली आहेत.
या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ४९ शतकासह दुसऱ्या स्थानावर आहे.त्याने ४६३ वनडेत ही शतके झळकावली आहेत.
इंग्लंड विरुद्धच्या कटक वनडे सामन्यात रोहित शर्मानं ३२ वे वनडे शतक झळकावले. तो सर्वाधिक वनडे शतक झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगनं ३७५ वनडे सामन्यात २८ शतके झळकावली आहेत.
श्रीलंकेचा सनथ जयसूर्या टॉप ५ मध्ये दिसतो. त्याने ४४५ सामन्यात २८ वनडे शतके झळकावली आहेत.
क्लिक करा