Tap to Read ➤
शरीरात कमी झालेलं रक्त भरून काढेल ही हिरवी पानं...
महिला आणि लहान मुलांमध्ये रक्ताची कमतरता दिवसेंदिवस वाढत आहे.
रोजची धावपळ, कामाचा वाढता ताण आणि योग्य आहार न घेतल्यानं शरीरात रक्त कमी होत आहे. रक्त कमी झालं तर एनीमिया, थकवा, कमजोरी जाणवते.
शरीरात रक्तातील हीमोग्लोबिन कमी झालं तर हेच एनीमियाचं कारण आहे. हीमोग्लोबिनमध्ये आयर्नची लेव्हल कायम ठेवणं गरजेचं असतं.
डिप्रेशन, थरथरी, चक्कर येणे, कमजोरी किंवा स्मरणशक्ती कमी होणे ही एमीनिया किंवा आयर्न कमी झाल्याची लक्षण आहेत.
आपल्या रोजच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून शरीरात कमी झालेलं रक्त वाढवता येतं. यात शेवग्याची पानं फायदेशीर ठरतात.
शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी शेवग्याची पानं वरदान मानली जातात. शेवग्याच्या 100 ग्रॅम वाळलेल्या पानांमध्ये जवळपास 28 मिलीग्रॅम आयर्न असतं.
आयर्नसोबतच शेवग्याच्या पानांमध्ये कॅरोटिनॉइड, डायटरी फायबर, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शिअमही असतं.
अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, शेवग्याचं पावडर लहान मुलांमधील आयर्नची कमतरता भरून काढतं.
शेवग्याच्या पावडरचं तुम्ही अर्धा चमचा सेवन करू शकता. हवं तर तुम्ही याचा वापर स्मूदीमध्येही किंवा चहामध्येही करू शकता.
क्लिक करा