नबीसह चाळीशीनंतर Champions Trophy स्पर्धेत पदार्पण करणारे ५ खेळाडू
वयाच्या चाळीशीनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पदार्पणाचा सामना खेळणारा नबी हा काही पहिला खेळाडू नाही, इथं पहा पाच खेळाडूंची यादी
मोहम्मद नबी हा अफगाणिस्तानच्या ताफ्यातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक वयात पदार्पण करणाऱ्या खास क्लबमध्ये त्याची एन्ट्री झाली.
सर्वाधिक वयात (४२ वर्षे २८४ दिवस) चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण करण्याचा रेकॉर्ड युएसएच्या डोनोव्हॅन ब्लेक (Donovan Blake) च्या नावे आहे. २००४ च्या हंगामात या खेळाडूनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणाचा सामना खेळला होता.
युएसएकडून टोनी रीड (Tony Reid) याने २००४ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या हंगामात ४२ वर्षे १५४ दिवस वय असताना न्यूझीलंड विरुद्ध पदार्पणाचा सामना खेळला होता.
युएसएच्या ताफ्यातून २००४ च्या हंगामात मार्क जोनसन याने देखील न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात ४० वर्षे ३१८ दिवस वयात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पदार्पणाचा सामना खेळला होता.
अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीनं ४० वर्षे ५१ दिवस या वयात कराचीच्या मैदानातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पदार्पणाचा सामना खेळला.
हॉवर्ड जॉन्सन हा आणखी एक खेळाडू आहे. ज्याने २००४ च्या आयसीसी हंगामात ४० वर्षे २५ दिवस वयात या स्पर्धेतील पदार्पणाचा सामना खेळला होता.