मीरा जगन्नाथला करावा लागलेला कास्टिंग काउचचा सामना
मीरा जगन्नाथ मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
मीरा जगन्नाथ मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सिनेइंडस्ट्रीत मीरा जगन्नाथला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता.
कास्टिंग काउचबद्दल मीरा म्हणते, मला दोनदा असा अनुभव आला. तू नवी आहेस, तुला कुणी ओळखत नाही, त्यामुळे तुला हे करावं लागेल असं मला सांगण्यात आलं. मी नाकारलं.
मेहनतीवरच संधी मिळावी असं वाटतं. काम मिळवण्यासाठीचे शॉर्टकट मला मान्य नाहीत, असे मीरा म्हणाली.
थोड्या दिवसाचं फेम, एखादी सीरीज किंवा चित्रपट मिळवून फार काही साध्य होत नाही. एकाच माणसाकडून मला दोनदा असा अनुभव आल्याचे मीराने सांगितले.
मीरा पुढे म्हणाली की, एकदा मला भूमिका देऊ करण्याचा बहाणा करून त्यानं हात पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी त्याच्या सरळ कानशिलात लगावली आणि निघून आले. त्यानंतर दोन वर्षं मी काही काम केलं नाही.
अशा प्रकारांमुळे कलाकार तणावात जावू शकतात. तुम्ही ठरवलं तर या सगळ्यापासून दूर राहू शकता. आता ओळखीतून आलेल्या कामालाच प्राधान्य देते, असेही तिने सांगितले.