Tap to Read ➤

'असं रुपडं देखणं, त्याला सूर्याचं रे दान...'

शरयू सोनावणे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
'पिंकीचा विजय असो' या मालिकेत तिने साकारलेली भूमिका चाहत्यांना प्रचंड आवडली.
सध्या अभिनेत्री झी मराठीवरील 'पारू' या मालिकेत काम करताना दिसतेय.
शरयूने नुकतेच तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.
कपाळावर चंद्रकोर, ओठांवर निखळ हसरी गुलाबी लाली अशा तिच्या लूकने चाहत्यांना घायाळ केलंय.
मोरपिशी रंगाच्या साडीमध्ये शरयू फारच कमाल दिसत आहे.
या फोटोंमध्ये मोत्यांचे कानातले, गळ्यात ठुशी परिधान केल्याने शरयूच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
तिच्या या पारंपरिक फोटोशूटने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.
क्लिक करा