Tap to Read ➤
धारदार नजर, ओठांवर हसू ; परी तेलंगचा मराठमोळा स्वॅग!
'लक्ष्य' फेम अभिनेत्री परी तेलंग हे नाव मराठी मालिकाविश्वात लोकप्रिय आहे.
नाटक, सिनेमा तसेच विविध मालिकांमध्ये काम करत परी तेलंग घराघरात पोहचली.
आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने रसिकांच्या मनात वेगळ स्थान निर्माण केलंय.
'आभाळमाया' मालिकेत देखील अभिनेत्रीने काम केलं आहे.
परी तेलंग सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
नुकतंच तिने गुढीपाडव्याचं औचित्य साधून इंस्टाग्रामवर तिचे खास फोटो पोस्ट केलेत.
कपाळावर चंद्रकोर, पांढऱ्या रंगाची साडी त्यावर साजेसे दागिने असा परीचा मराठमोळा स्वॅग पाहायला मिळतोय.
अभिनेत्रीचे असे पारंपरिक पेहरावातील फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
क्लिक करा