Tap to Read ➤

डिट्टो स्मिता पाटील! नंदिताचे 'जैत रे जैत' अंदाजातील PHOTO

मराठमोळी अभिनेत्री नंदिता पाटकर तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
नंदिताने अभिनेत्री स्मिता पाटील यांचा 'जैत रे जैत' अंदाज रिक्रिएट करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
भारतीय सिनेसृष्टीत स्मिता पाटील यांचं नाव मोठ्या अदबीने घेतलं जातं.
अभिनेत्रीने स्मिता पाटील यांचा 'जैत रे जैत' चित्रपटातील हूबेहूब लूक करत फोटोज क्लिक केलेत.
नंदिता पाटकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो पोस्ट केले आहेत.
चेहऱ्यावर गोंदण, नाकात नथ तसेच साडीचोळी परिधान करून काढलेले फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
नंदिताचे हे फोटो पाहून चाहत्यांना स्मिता पाटील यांची आठवण झाली आहे.
तिच्या फोटोंवर "लय भारी", किती डिट्टो दिसतेय तू", 'स्मिता पाटील यांची आठवण झाली' अशा कमेंट यूजर्सनी केल्या आहेत.
क्लिक करा