Tap to Read ➤

डेनिम स्कर्ट अन् पांढरा शर्ट; साध्या भोळ्या रमाचा ट्रेंडी लूक

स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली.
या मालिकेचं कथानक तसेच त्यातील पात्रांनी देखील चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला.
'मुरांबा' मालिकेत अभिनेता शशांक केतकर तसेच शिवानी मुंढेकर मुख्य भूमिकेत आहेत.
मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकरने 'रमा' नावाचं पात्र साकारलं आहे.
साधा मनमिळावू स्वभाव असणाऱ्या रमाने चाहत्यांना आपलंस केलं आहे.
सध्या मालिकेत दोन वेण्या घालणाऱ्या साध्याभोळ्या रमाने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.
सोशल मीडियावर शिवानीने तिचे काही हटके फोटोज शेअर केलेत.
डेनिम स्कर्ट त्यावर पांढरा शर्ट परिधान करून अभिनेत्रीने नवं फोटोशूट केलंय.
शिवानीचा असा घायाळ करणारा अंदाज पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
क्लिक करा