Tap to Read ➤
'कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे गं अंतर्यामी...'
अभिनेत्री वैदेही परशुराने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली.
'वेड लावी जीवा' या मराठी चित्रपटातून वैदेहीनं सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
शिवाय डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं होतं.
वैदेहीनं 'सिम्बा' या हिंदी चित्रपटात साकारलेली आकृती दवे ही भूमिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडली.
रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात वैदेहीनं रणवीर सिंहसोबत मोठा पडदा गाजवला होता.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी वैदेही नेहमी तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
अलिकडेच तिनं केसात गजरा,निळ्या रंगाची साडी असा पेहराव केलेले फोटो इंटरनेटवर शेअर केलेत.
त्यामुळे सध्या सगळीकडेच अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा होताना दिसतेय.
क्लिक करा