Tap to Read ➤

'विनम्र अभिनेत्री...'  प्रियदर्शिनी इंदलकरचे हटके फोटोशूट

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर.
'फुलराणी' या मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवत प्रियदर्शिनी प्रकाशझोतात आली.
विविधांगी भूमिका साकारून तिने कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विनम्र अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर अशी तिची ओळख बनली आहे.
हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
नुकतेच तिने शेअर केलेल्या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
प्रियदर्शिनीने पांढऱ्या रंगाच्या कॉटन फ्रॉकमध्ये भन्नाट फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये तिने काळे-कुरळे केस मोकळे सोडून काळ्या रंगाचे बूट हिल्स घातले आहेत.
प्रियदर्शनीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.
क्लिक करा