Tap to Read ➤
टाइमलेस ब्युटी @अश्विनी भावे
आजही अश्विनी यांचा फिटनेस आणि सौंदर्य २० वर्षाच्या तरुणीला लाजवेल असा आहे.
मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन ब्युटी असलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे.
गेल्या कित्येक वर्षांपासून अश्विनी भावे यांचा कलाविश्वात वावर आहे.
१९९० च्या काळात मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी त्यांच्या अभिनयाचा डंका वाजवला.
आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. त्यामुळे आजही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही.
अश्विनी भावे यांनी वयाची पन्नाशी पार केली आहे. मात्र, त्यांचा फिटनेस आणि सौंदर्य आजही २० वर्षाच्या तरुणीला लाजवेल असंच आहे.
अश्विनी भावे सोशल मीडियावर कमालीच्या सक्रीय आहेत. त्यामुळे त्या वरचेवर त्यांचे फोटो शेअर करत असतात.
अलिकडेच त्यांनी एक फोटोशूट केलं आहे.त्यातील काही निवडक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले.
अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस सिनेमात काम केलं आहे.
'हिना', 'सैनिक, 'बंधन' या बॉलिवूड सिनेमात अश्विनी भावे यांनी भूमिका साकारल्या आहेत.
क्लिक करा