Tap to Read ➤

"महाराष्ट्राची क्रश.." शिवालीच्या फोटोंवर चाहत्याची भन्नाट कमेंट

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब सातत्याने चर्चेत येत असते.
मूळची सावंतवाडीची शिवाली या शोच्या माध्यमातून नावारूपाला आली.
दमदार विनोदी शैलीच्या जोरावर तिने हास्याचे फुलोरे उडवत प्रेक्षकांना खळखळून हसवलं.
प्रचंड संघर्ष करून अभिनेत्रीने कलाविश्वात स्वत:चं हक्काचं स्थान मिळवलं आहे.
विनोदाचं अचूक टायमिंग साधत कल्याणच्या चुलबुलीने प्रेक्षकांना आपलंस केलं.
शिवाली सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत लाईमलाईटमध्ये येत असते.
नुकतेच तिने फ्लोरल आउटफिट मधील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेत.
'Happy Eyes' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
शिवालीच्या व्हायरल फोटोंवर एका चाहत्याने 'महाराष्ट्राची क्रश' अशी कमेंट केल्याचं पाहायला मिळतंय.
क्लिक करा