30 सप्टेंबरला बंद होणार LIC ची 'ही' खास पॉलिसी, लवकर घ्या लाभ...
LIC ची 'धन वृद्धी पॉलिसी' 30 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे.
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC वर लाखो लोकांचा विश्वास आहे. LIC वेळोवेळी ग्राहकांसाठी वेगवेगळ्या पॉलिसी आणत असते. त्यापैकी एक 'धन वृद्धी पॉलिसी' आहे.
एलआयसीची ही सिंगल प्रीमियम पॉलिसी आहे. तुम्ही एकदा पैसे जमा केले की, आयुष्यभर त्याचा फायदा होतो. मात्र आता ही पॉलिसी 30 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे.
ही सिंगल प्रीमियम विमा योजना आहे. ही नॉन-लिंक्ड, नॉन पार्टिसिपेंट्स, वैयक्तिक बचत, सिंगल प्रीमियम लाइफ प्लॅन आहे, जी गुंतवणूकदारांना जीवन संरक्षण आणि बचत दोन्हीचा लाभ देते.
गुंतवणूकदार कधीही योजनेतून बाहेर पडू शकतात आणि या योजनेवर कर्ज घेण्यासह 80C अंतर्गत कर कपातीचा लाभ देखील घेऊ शकतात. LIC धन वृद्धी योजना 10, 15 आणि 18 वर्षांसाठी आहे.
एलआयसीने ही पॉलिसी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी फक्त 5 दिवस शिल्लक आहेत. धन वृद्धी योजना ही सुरक्षा आणि बचत यांचा संगम आहे.
पॉलिसीच्या कालावधीत विमाधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. यात विमाधारकाला मॅच्युरिटीनंतर एकरकमी रक्कमदेखील मिळते.
धन वृद्धी योजनेंतर्गत, मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक सेटलमेंटचा पर्याय आहे. पॉलिसी धारक पॉलिसीचे 3 महिने पूर्ण झाल्यानंतर कर्ज घेऊ शकतात.