Tap to Read ➤

रोज वाचवा ४५ रुपये, LIC च्या ‘या’ स्कीममध्ये मिळतील २५ लाख

एलआयसीच्या या स्कीममध्ये छोटी गुंतवणूक करून तुम्ही लाखोंचा फंड तयार करू शकता.
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी सेव्हिंग स्कीम सुरक्षा आणि रिटर्न याबाबतीत परिचित आहे.
प्रत्येक वयाच्या लोकांसाठी एलआयसीकडे पॉलिसी उपलब्ध आहे. छोट्या गुंतवणूकीतूनही तुम्ही मोठा फंड जमा करू शकता.
एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये तुम्ही रोज ४५ रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही २५ लाखांचा फंड तयार करू शकता.
ही एक टर्म पॉलिसी प्रमाणे आहे. जेवढ्या कालावधीसाठी तुमची पॉलिसी आहे, तितक्या कालावधीसाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता.
या स्कीममध्ये एक लाख रुपयांचा सम अशॉर्ड असते आणि याची कमाल कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.
रोज ४५ रुपये याप्रमाणे जर तुम्ही ३५ वर्षांसाठी गुंतवणूक केली, तर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला २५ लाखांची रक्कम मिळेल.
वार्षिक आधारावर तुम्ही १६३०० रुपयांची यात गुंतवणूक केली, तर ३५ वर्षांत तुम्ही ५७०५०० रुपयांची गुंतवणूक कराल.
पॉलिसी टर्मनुसार यात बेसिक सम अशॉर्ड ५ लाखांचा असेल. मॅच्युरिटीनंतर रिविजनरी बोनस ८.६० लाख, फायनल बोनस ११.५० लाख जोडून दिला जाईल.
या पॉलिसीत दोन वेळा बोनस दिला जातो. परंतु यासाठी तुमची पॉलिसी १५ वर्षांची असणं आवश्यक आहे.
एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी घेणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे टॅक्स बेनिफिट दिले जात नाहीत.
यामध्ये तुम्हाला डिसेबलीटी रायडर, ॲक्सिडेंट बेनिफिट, न्यू टर्म इन्शूरन्स रायडर आणि क्रिटिकल बेनिफिट रायडर यांचा समावेश करण्यात आलाय.
क्लिक करा