Tap to Read ➤

LIC जीवन आनंद : महिन्याला जमा करा १३५८ रुपये, 'असे' मिळतील २५ लाख

एलआयसीकडे एकापेक्षा एक उत्तम पॉलिसी आहेत.
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीकडे एकापेक्षा एक उत्तम पॉलिसी आहेत. यामध्ये तुमचा पैसा सुरक्षित राहतो.
आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या अशाच एका पॉलिसीबद्दल सांगत आहोत. याचं नाव आहे एलआयसी जीवन आनंद.
याचा प्रीमिअम टर्म पॉलिसीप्रमाणेच असतो. म्हणजे जोपर्यंत तुमची पॉलिसी आहे, तो पर्यंत तुम्ही प्रीमिअम भरू शकता.
या पॉलिसीत जवळपास १३५८ रुपये महिन्याला जमा करून २५ लाख मिळवू शकता.
२५ लाखांची रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला यात ३५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागणार आहे.
महिन्याला १३५८ रुपयांच्या हिशोबानं तुम्ही ३५ वर्षांमध्ये ५.७० लाख रुपये जमा कराल.
यात बेसिक सम अश्योर्ड ५ लाख, रिविजनरी बोनस ८.६० लाख, फायनल अॅडिशनल बोनस ११.५० लाख आणि टोटल रिटर्न २५ लाख मिळतात.
जर काही कारणास्तव पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीला पॉलिसीच्या १२५ टक्के डेथ बेनिफिट मिळेल.
क्लिक करा