Tap to Read ➤

LIC आधार स्तंभ पॉलिसी : महिन्याला ५०० रुपये वाचवा, मिळतील २ लाख

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीकडे अनेक उत्तम स्कीम्स आहेत .
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीकडे अनेक स्कीम्स आहेत आणि त्याचा फायदा लाखो लोकांना होत आहे. आज आपण एलआयसीच्या अशाच स्वस्त प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत.
कमी उत्पन्न असलेल्या लोकांना लक्षात ठेवून ही स्कीम तयार करण्यात आलीये. यामध्ये तुम्ही ५०० रुपयांपासून सुरुवात करू शकता.
या पॉलिसीचं नाव आहे एलआयसी आधार स्तंभ. यामध्ये अशा काही सुविधा आहेत ज्या अन्य पॉलिसीमध्ये मिळत नाहीत.
जर तुम्ही काही कारणास्तव प्रीमिअम भरू शकला नाही, तेव्हाही प्रीमिअम आपणहून जमा होण्याचा पर्याय असतो. याचा लाभ घेण्यासाठी ही पॉलिसी किमान ३ वर्षांसाठी चालवावी लागेल.
जर एखाद्यानं २० वर्षांसाठी ५०० रुपयांचा प्रीमिअम भरला तर त्याला मॅच्युरिटीच्या वेळी १.५ लाख रुपये अधिक रॉयल्टीचे ४८,७५० रुपये मिळतील. ही रक्कम १.९८ लाखांपेक्षा अधिक असेल.
जर पॉलिसी घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला १.९८ लाख रुपयांची रक्कम नॉमिनीला मिळेल. याशिवाय यात ८० सी अंतर्गत टॅक्स सूटही मिळते.
क्लिक करा