लिंबाच्या रसाचेही आहेत साईड इफेक्टस, चेहऱ्यावर लावला तर करावा लागेल पश्चाताप

लिंबाच्या रसाचा थेट वापर करतांना करा विचार

प्रत्येक घरात सहज उपलब्ध होणारं फळ म्हणजे लिंबू.

पदार्थाची चव वाढवणारं लिंबू गुणवर्धकदेखील आहे. त्यामुळे अनेक शारीरिक समस्यांमध्ये लिंबाचा वापर केला जातो.

अनेकदा फेसपॅक किंवा हेअर मास्क करतांना लिंबाच्या रसाचा वापर केला जातो. परंतु, लिंबाच्या रसाचा थेट चेहऱ्यावर वापर करणं त्रासदायक ठरु शकतं.

लिंबामध्ये सॅट्रिक अॅसिड असतं ज्यामुळे चेहऱ्यावर थेट लिंबाचा रस लावल्यास त्वचेची जळजळ होऊ शकते.

अनेकदा सेंसेटिव्ह स्कीन असलेल्या लोकांनी  चेहऱ्यावर लिंबाचा रस लावल्यास खाज सुटणे, त्वचा लालसर होणे किंवा सनबर्न होणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

लिंबाचा रस चेहऱ्यावर लावून जर तुम्ही सुर्यप्रकाशात गेलात. तर,चेहऱ्यावर काळे डाग पडण्याची शक्यता आहे.

दोडक्याची भाजी खा अन् एनिमियाच्या त्रासाला ठेवा दूर

Click Here