'या' देशात होते सर्वात महागड्या बटाट्याची शेती, किंमत आहे ₹५०००० किलो
पाहा कुठे मिळतो सर्वात महागडा बटाटा...
बटाट्याची भाजी ही जवळपास सर्वांनाच आवडत असेल आणि त्याची शेतीही देशात अनेक ठिकाणी होते.
वर्षाचे सर्वच महिने आपल्याकडे बटाटे उपलब्ध असतात. २० रुपये, ४० रुपये, ५०-६० रुपये अशी याची किंमत कमी जास्त होत असते.
पण तुम्हाला माहितीये का जगात अशाही प्रकारचा बटाटा मिळतो ज्याची किंमत सामान्यांच्या अवाक्या बाहेर आहे.
हा बटाटा खरेदी करायचा असेल तर एका किलोसाठी तुम्हाला हजारो रुपये खर्च करावे लागतील. याचं नाव ले बोनोटे असं आहे आणि याची शेती फ्रान्समध्ये केली जाते.
याची किंमत सोन्यापेक्षाही अधिक आहे असं म्हटलं जातं. अशातच या किंमतीत आपल्याकडे अनेक महिन्यांचं रेशन येईल.
फ्रान्सच्या मर्यादित क्षेत्रातच ले बोनोटे या बटाट्याची शेती केली जाते. याची किंमत ५० हजार ९० हजार रुपयांच्या दरम्यान असते.
ले बोनोटेची चव याला सामान्य बटाट्यापेक्षा निराळं बनवते. याची भाजी केली जात नाही,तर हे पहिले पाण्यात उकडले जातात. त्यानंतर बटर आणि मीठ टाकून ते खाल्ले जातात.