Tap to Read ➤

'लग्नाची बेडी'मधील 'सिंधू' दिसते खूपच HOT अन् ग्लॅमरस!

अभिनेत्री सायली देवधरची वेगळी बाजू...
लग्नाची बेडी मालिकेतील अभिनेत्री सायली देवधर म्हणजेच 'सिंधू'ला तुम्ही टेलिव्हिजनवर पारंपारिक आणि सोज्वळ रुपात पाहिलं असेलच.
पडद्यामागची 'सिंधू' कशीय? म्हणजेच खऱ्या आयुष्यातील अभिनेत्री सायली देवधरचा वेगळा लूक आपण आज पाहणार आहोत.
अभिनेत्री सायली देवधरचं सुंदर, सोज्वळ आणि पारंपारिक पेहरावातलं रुप तुम्ही टेलिव्हिजनवर रोज पाहता.
पण वैयक्तिक आयुष्यात सायली देवधर खूपच ग्लॅमरस आणि हॉट आहे.
'लग्नाची बेडी' मालिकेआधीही तिनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
'लग्नाची बेडी' मालिकेतील 'सिंधू' नावाच्या भूमिकेनं तिला एक वेगळी ओळख दिली.
'सिंधू' ही एक अल्लड मुलगी असली तरी ती खूप हुशार, समंजस आणि जबाबदारी घेणारी मुली दाखवण्यात आली आहे.
'सिंधू' म्हणजेच अभिनेत्री सायली देवधर हिचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहत्यांनाही थोडावेळ विश्वास बसेना की ही तिच आहे का?
सायली मालिकेत नेहमीच साडीत दिसते आणि ती घर सांभाळणारी आणि कुटुंबाला एकत्र ठेवणाऱ्या सुनेच्या भूमिकेत आहे.
सायली सोशल मीडियातही चांगली सक्रिय असते आणि तिचे फोटो शेअर करत असते.
सायलीचे इन्स्टाग्रामवरही हजारो चाहते आहेत आणि ते तिच्या फोटोंवर भरभरुन कमेंट्स करत असतात.
क्लिक करा