Tap to Read ➤

उगवली शुक्राची चांदणी! पाहा पांढऱ्या साडीतले ‘क्लासी’लूक!

पांढरी साडी अंगावर खुलतच नाही, असं अनेकींना वाटतं. त्यासाठीच बघा या खास आयडिया.. कोजागरी स्पेशल पांढऱ्या साडीतले काही स्पेशल लूक तुम्हीही ट्राय करू शकता.
कोजागरीनिमित्त सोसायटीतले सदस्य, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्यासोबत अनेक जण छोटेखानी पार्टी आयोजित करतात.
दुधासोबत गप्पा- गाणी असा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमात कोजागरी थीमनुसार पांढरी साडी नेसणार असाल, तर बॉलीवूडच्या सौंदर्यवतींकडून या काही मेकअप टिप्स घ्या...
पांढऱ्या साडीवर मोत्याचे दागिने सुंदरच दिसतात. त्यामुळे असा एखादा मोत्याचा सेट ट्राय करा.
हल्ली पांढऱ्या साडीवर ऑक्सिडाईज ज्वेलरी घालण्याचाही ट्रेण्ड आहे..
खूप मेकअप न करता केसांत एखादं गुलाबाचं गुलाबी, लाल फुल माळलं तरी तुमचा लूक सगळ्यांपेक्षा वेगळा दिसेल.
जान्हवी कपूरचा हा लूक अतिशय क्लासी आहे. हेवी वर्क साडी असेल तर खूप दागिने घालण्याची काहीच गरज नाही..
क्लिक करा