Tap to Read ➤

ब्यूटी विथ ब्रेन! कोण आहे दुबईत दिसलेली ती मिस्ट्री गर्ल?

इथं पाहा तिचे रोहित-रितिकासह  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतचे खास फोटो
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुबईत रंगलेल्या सेमी फायनलमध्ये स्टँडमध्ये फोटो क्लिक करणारी सुंदरी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले. मॅच वेळी तिच्यावर कॅमेरा फिरला अन्  ही मिस्ट्री गर्ल कोण? असा प्रश्न सोशल मीडियावर चर्चेत आला.
या मिस्ट्री गर्लंचं नाव पायल धारे असं आहे. ती गेमर, स्ट्रिमर आणि कंटेट क्रिएटरच्या रुपात लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचे दिसून येते, इन्स्टाग्रमावरील तिच्या फॉलोअर्सचा आकडा हा ३.८ मिलियनच्या घरात आहे.
तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील पोस्टमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासोबतचा फोटोही शेअर केल्याचे दिसते.
पायलनं रोहितसोबतचाच नाही तर रितिकासोबतचाही एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केल्याचे दिसून येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या ग्रेट भेटीचा फोटोही पायलनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे.
पायल भारतातील सर्वोत्तम महिला गेमरपैकी एक आहे. या क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल तिला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते खास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ती चर्चेत आल्यावर आता हे फोटोही व्हायरल होताना दिसते.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एक झलकमुळे तिच्या सौंदर्याची चर्चा रंगली. पण पुरस्काराची गोष्ट समजल्यावर ती ब्यूटी ब्रेन आहे, असा टॅगही तिला लावण्यात येतोय.
क्लिक करा