Tap to Read ➤
प्रत्येक ऑर्डरवर Zomato इतके रुपये कमावते, पाहा किती आहे कमाई
फूड डिलिव्हरी ऑर्डरमध्ये झोमॅटो, स्विगी लीडिंग प्लेअर्स आहेत.
आजच्या काळात अनेक जण ऑनलाइन फूड ऑर्डर करत असतात. त्यासाठी लोक फूड डिलिव्हरी अॅपची मदत घेतात.
यामध्ये झोमॅटो, स्विगी लीडिंग प्लेअर्स आहेत. पाहूया झोमॅटोला प्रत्येक ऑर्डरवर सरासरी किती पैसे मिळतात.
झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी एका मुलाखतीत प्रति ऑर्डर मिळणाऱ्या कमाईबाबत माहिती दिलीये.
प्रति ऑर्डर सरासरी २० टक्क्यांची कमाई कंपनीला होत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
जर तुम्ही ४०० रुपयांची ऑर्डर केली, तर झोमॅटोला त्याचे २० टक्के म्हणजे ८० रुपये मिळतात असं त्यांनी म्हटलं होतं.
अनेकदा कमाईचा आकडा हा ऑर्डरच्या डिस्टन्सच्याही आधारे निश्चित केला जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
त्यानंतर कस्टमर सपोर्ट कॉस्ट, पेमेंट गेटवे फी आणि रिफंडचा खर्च यानंतर सरासरी ५ ते १० रुपये प्रति ऑर्डर वाचतात.
क्लिक करा