Tap to Read ➤

वयानुसार आपल्या शरीराला दररोज किती कॅल्शियम लागते?

हाडं आणि दातांसाठी कॅल्शियम गरजेचंच
कॅल्शियम शरीरातील महत्त्वाचा घटक असून वयानुसार आहारात दररोज किती कॅल्शियम घ्यावे हे समजून घ्यायला हवे.
जन्मापासून ते ६ महिन्यापर्यंतच्या बाळाला दररोज २०० ग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते. जन्माच्या वेळी बाळाच्या शरीरात २६ ते ३० मिलीग्रॅम कॅल्शियम असते.
बाळ ६ महिन्याचे झाल्यापासून हालचाली वाढत असल्याने वर्षाचे होईपर्यंत दररोज २६० मिलीग्रॅम कॅल्शियम मिळायला हवे.
वयाच्या १ ते ३ वर्षापर्यंत मुलांना ७०० मिलीग्रॅम कॅल्शियम दररोज मिळायला हवे.
साधारण ४ ते ८ वर्षापर्यंत कॅल्शियमची ही गरज १००० मिलीग्रॅमपर्यंत वाढते.
लहान मुलांमधून टीनएजर कॅटेगरीमध्ये जाणाऱ्या ९ ते १८ वर्षाच्या मुलांना दररोज १३०० मिलीग्रॅम कॅल्शियम मिळायला हवे.
एका विशिष्ट वयानंतर किंवा शारीरिक वाढीनतंर कॅल्शियमची आवश्यकता थोडी कमी होते. म्हणजेच १९ ते ५० वर्षे वयाच्या व्यक्तींना दररोज १००० मिलीग्रॅम कॅल्शियम मिळायला हवे.
वयाच्या ५१ वर्षानंतर म्हणजेच उतारवयात पुरुषांची कॅल्शियमची गरज १००० मिलीग्रॅम म्हणजे तेवढीच राहते पण स्त्रियांमध्ये ही गरज वाढून १२०० मिलीग्रॅम होते.
क्लिक करा