क्रेडिट कार्डमुळे सामान्य लोकांचं जीवन अधिक सुकर झालं आहे.
क्रेडिट कार्डमुळे सामान्य लोकांचं जीवन अधिक सुकर झालं आहे. सध्या अनेक लोक क्रेडिट कार्डाचा वापर करतात. कोणाकडे एक क्रेडिट कार्ड असतं तर कोणाकडे त्यापेक्षा जास्त.
जिकडे क्रेडिट कार्डाचे काही फायदे असतात तसे त्याचे काही तोटेही आहेत. पाहूया अधिक क्रेडिट कार्ड ठेवण्याचे काय आहेत फायदे आणि कोणतं आहे नुकसान.
क्रेडिट कार्ड आपल्याला अनेकदा डिस्काऊंट, पैसे दिल्यानंतर ५० दिवसांसाठी विना व्याज सुविधा पुरवतात. याद्वारे आपण बिलांचा भरणाही करू शकतो.
इतकंच नाही तर गरजेच्या वेळी तुम्ही रोख रक्कमही याद्वारे काढू शकता. यासाठी क्रेडिट कार्डाचे फायदे अनेक आहे. पण काही चुकांमुळे तुम्हाला मोठं नुकसानही होऊ शकतं.
जर तुम्ही क्रेडिट कार्ड असूनही त्याचा वापर केला नाही, तर तुमच्या फायनान्शिअल प्रोफाईलवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तुमचा क्रेडिट स्कोअरही खराब होऊ शकतो.
तुमचे दैनंदिन खर्च आणि लाईफस्टाईल समजून घेऊनच तुम्ही दुसऱ्या कार्डाचा विचार करा.
जर तुम्ही विमान प्रवास करत असाल तर त्या दृष्टीनं उपयुक्त कार्ड घ्या. तुम्ही जर शॉपिंग अधिक करत असाल तर शॉपिंग क्रेडिट कार्ड घेणं फायद्याचं ठरेल.