Tap to Read ➤

अस्सल हापूस आंबा कसा ओळखाल? ५ गोष्टी कायम लक्षात ठेवा; पाहा सोपी पद्धत

आंब्याचा सीझन सुरू आहे. फळांच्या राजाची अस्सलता कशी ओळखाल?
आंबाप्रेमी आणि हापूस यांचे नाते वेगळेच आहे. कोकणातील हापूस आंब्याचा दर कितीही वाढला असला तरी मागणी कमी होत नाही.
केवळ देशात नाही तर परदेशातही हापूस आंब्याला जास्त मागणी असते. यामध्ये देवगड हापूस, रत्नागिरी हापूस असेल असे अनेक प्रकार मोडतात.
हापूस आंब्याचे उत्पादन देशात काही ठिकाणी घेतले जाते. परंतु, कोकणातील हापूस आंब्याला मागणी अधिक असते. अनेकदा हापूस आंबा आहे सांगून ग्राहकांना सर्रासपणे फसवले जाते. त्यामुळे अस्सल हापूस ओळखता आला पाहिजे.
नैसर्गिक मधूर स्वाद, अविट गोडीमुळे हापूस आंबा कायम भाव खातो. रत्नागिरीतील हापूस कर्नाटकात लागवड केल्याने या हंगामातच तो तयार होतो.
काही विक्रेते रत्नागिरी हापूस सांगत चक्क ग्राहकांच्या माथी कर्नाटक किंवा अन्य ठिकाणचा हापूस मारतात. फसवणूक आणि मनस्ताप होऊ नये, यासाठी खरा हापूस आंबा ओळखता यायाला हवा. अस्सल हापूस आंबा ओळखणे सोपे आहे.
हापूस आंबा अस्सल आहे की नाही हे तपासून घेण्यासाठी काही गोष्टी चेक करणे आवश्यक आहे. नेमके कसे ओळखावे? यासाठी अगदी सोप्या पद्धती किंवा गोष्टी सांगितल्या जातात.
रत्नागिरी किंवा देवगड हापूस आंबा. आकाराने गोलाकार असतो. साल पातळ असते. देठाकडे पिवळसर तर टोकाकडे हिरवट असतो.
आंबा पिकल्यानंतर काळे डाग पडू लागतात. अस्सल हापूस आंबा पिकला की, त्याचा घमघमाट सुटतो. हा सुगंध लांबूनही ओळखता येतो.
नैसर्गिकरित्या पिकवलेल्या अस्सल हापूस आंब्याचा सुगंध गोडसर, मधाळ असा सुवास येतो. तसेच त्याची साल पातळ असते.
आंब्याच्या रंगावरुनही प्रमुख फरक जाणवू शकतो. अस्सल हापूस आंब्यात पिवळा, हिरवा, केशरी रंगाच्या छटा असतात.
आंब्याची चव हे हापूस आंब्याच्या जगभर पसरलेल्या प्रसिद्धीचे एकमेव कारण आहे. या आंब्याची फोड मोठी आणि जास्त रसदार असते.
पिकलेल्या हापूस आंब्याची साल आपण सहजरित्या हाताने काढू शकतो. तसेच या सालीला आंब्याचा गर लागत नाही.
एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात आंबा बुडवा, जर आंबा बुडाला तर तो नैसर्गिकरित्या पिकलेला आहे.
आंबा तरंगत राहिला तर तो रसायने वापरुन पिकवलेला आहे, असे समजावे. हापूस आंब्याचा वास, त्याचा केशरी गर यावरुन सहजरित्या ओळखू शकतो.
क्लिक करा